शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! 100 टक्के अनुदानावरती मिळत आहे मोफत फवारणी पंप इथे करा आजच अर्ज

नमस्कार मित्रांनो सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीकपद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कपाशी, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांतील मूल्यसाखळीस चालना देण्यासाठी राज्य शासन तीन वर्षांसाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे.

राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.या योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामात बॅटरी संचालित फवारणी पंपाचा १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाइन अर्जातून ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 

हे सुद्धा बघा : रेशन धारकांसाठी मोठी बातमी.! मोफत तांदूळ सोबत मिळणार तुम्हाला आता या नवीन 9 वस्तू

Leave a Comment