नमस्कार मित्रांनोकाही दिवसांपूर्वीच सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जाते. परंतु आता यानंतर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी आणखी दोन मोठ्या घोषणा केलेल्या आहेत.त्या म्हणजे आता राज्य सरकार महिलांना पार्ट टाइम चार तासांचा जॉब देणार आहे. या माध्यमातून थेट टाटा कंपनीमध्ये जॉब लागणार आहे. तसेच या द्वारे महिलांना एक वेळचं जेवण आणि नाश्ता देखील मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता गरजू महिलांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.
हे सुद्धा बघा : मोदी सरकारचा मोठा निर्णय.! आता इतके वर्ष मिळणार सर्वांना मोफत रेशन धान्य
दरवर्षी एक लाख मुलींना संरक्षणाचे शिक्षण देखील देण्यात येणार आहे. अशी चंद्रकांत पाटील यांनी दुसरी घोषणा केलेली आहे. या नंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि या दोन घोषणांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.
हे सुद्धा बघा : मोदी सरकारचा मोठा निर्णय.! आता इतके वर्ष मिळणार सर्वांना मोफत रेशन धान्य
या योजनांबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “दोन गोष्टी आहेत. आज 5000 मुलींना लाठी काठीचा प्रशिक्षण दिल्यानंतर मी एक लाख मुलींचं टार्गेट मारणारी घोषणा केली. या लाठीकाठी शिकलेल्या 100 मुलींना मी दर महिन्याला दहा हजार रुपये मानधन देणार आहे. हे मानधन घेऊन त्या मुली दिवसभर कॉलेज वगैरे करतील. आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठीकाठी शिकवतील आता 27 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी 600 खेळाडूंवर आली आहे. त्यांना पारितोषिक मिळाले आहेत कोल्हापूरच्या तरुणांनी ती केलेली आहे. आणि आता कोल्हापूरच्या गल्लीबोलांमध्ये सर्वांचे हातात काठात असतात. त्यामुळे ही घोषणा केलेली आहे.”