नमस्कार मित्रांनो अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे.
महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे.
इथे क्लिक करून बघा अर्ज कशाप्रकारे करायचा
पण या योजनेचा लाभ कसा घेणार आणि कोणाला घेता येणार? तसेच, या योजनेसाठी अर्ज कसा कोणाकडे करायचा? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडले असतील. त्यासाठीच पुढील माहिती.
लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुमारे एक कोटी महिलांना घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी वर्षाला 2 लाख 50 हजार 500 रुपये पेक्षा कमी आवक असा निकष आहे.
राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी, तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलीय.