कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे 20 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा इथे बघा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो महायुती सरकारने २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता.

त्यानुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार ५४८ कोटी रुपये, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार ६४६ कोटी रुपये असे एकूण चार हजार १९४ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले होते.मात्र वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या ६० टक्के च्य मर्यादेतच म्हणजे दोन हजार ५१६ कोटी ८० लाख रुपये निधी उपलब्ध करून देत त्याच्या वितरणास गेल्याच आठवड्यात परवानगी दिली होती.

हे सुद्धा बघा : खाद्यतेलाच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ 15 लिटरच्या तेलाच्या डब्यासाठी मोजावे लागणार आता इतके रुपये

अपुऱ्या निधीमुळे काही भागांत कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अर्थसाह्य मिळू शकले नव्हते. त्याबाबत शेतकऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर वित्त विभागाने आणखी एक हजार ६०० कोटी रुपये मदतीच्या प्रस्तावास मान्यता दिली असून त्यानुसार हा निधी कृषी आयुक्तांना पाठविण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्याने दिली.

हे सुद्धा बघा : खाद्यतेलाच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ 15 लिटरच्या तेलाच्या डब्यासाठी मोजावे लागणार आता इतके रुपये

Leave a Comment