नमस्कार मित्रांनो महिलांच्या सक्षमीकरण आणि आर्थिक सहाय्याकरिता राज्य सरकारने ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली आहे. १ जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून ही अर्ज प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
त्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही अर्जप्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता. ऑफलाईन अर्जाकरता तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, प्रभाग समितीमध्ये संपर्क साधू शकता. तर, ऑनलाईन अर्जाकरिता ॲप आणि वेबसाईटचा वापर करू शकता.
अर्ज करताना आधार कार्डावर तुमचे जे नाव असेल त्याच नावाने अर्ज करावा लागणार आहे. शिवाय उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे अथवा केशरी रेशनकार्डव्दारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल. तसेच एक हमीपत्र भरून देणे गरजेचे आहे. याशिवाय आधारकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, बँक खात्याचा तपशील आणि देणे बंधनकारक आहे. दिलेल्या बँक खात्याचे केवाइसी करुन घेणे आवश्यक आहे
इथे क्लिक करून बघा खात्यात पैसे मिळाले नाही तर तत्काळ करा हे काम