लाभार्थ्यांची निवड प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्हाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाणार आहे. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जांच्या उपलब्धतेवर आधारित पारदर्शक पद्धतीने लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाणार आहे. कोट्याइतकीच अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादीदेखील तयार केली जाणार आहे. या योजनेसाठी दि. 31 ऑक्टोबरपूर्वी ऑफलाईन व त्यानंतर पोर्टल, मोबाईल अॅपद्वारे, सेतू केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.