36,000 रुपये वार्षिक पेन्शन.
देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने 12 सप्टेंबर 2019 रोजी ही पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली. देशातील सर्व लहान आणि अत्यल्प शेतकरी पेन्शन फंडात मासिक वर्गणी भरून या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेच्या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी, शेतकरी ६० वर्षांचा होईपर्यंत मासिक हप्त्यांमध्ये ठराविक रक्कम भरणे आवश्यक आहे. वयाच्या ६० नंतर शेतकऱ्याला दरमहा ३,००० रुपये आणि वर्षाला ३६,००० रुपये मिळतात. या संदर्भात, प्रामुख्याने 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेसाठी 55 रुपये मासिक शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने वयाच्या ४० व्या वर्षी ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा २०० रुपये जमा करावे लागतील.
maandhan.in ही अधिकृत वेबसाइट सरकारने उपलब्ध करून दिली आहे. शेतकरी त्यांची सर्व माहिती पूर्ण करून अर्ज करू शकतात.
शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत वर्षाला ₹6000 मिळत असतात व किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 36 हजार रुपये देखील मिळत असतात त्यामुळे या दोघी योजनांना मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 42 हजार रुपये मिळू शकतात तर आजच या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही देखील वर्षाला 42 हजार रुपये मिळवू शकतात.