नमस्कार मित्रांनो आत्तापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.मात्र सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये अजूनही महिलांना मिळाले नाहीत.
परंतु आता येत्या २९ तारखेला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल. महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार आहे.
हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेनंतर वृद्धांना सरकार देत आहे 3 हजार रुपये खात्यात इथे करा आजच अर्ज
हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम कार्यक्रम आहे. ज्या महिलांनी सप्टेंबर पर्यंत अर्ज केले आहेत त्यांना त्या दिवशी १५०० रुपयांचा आर्थिक लाभ मिळेल. अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या अर्जात त्रुटी राहिल्यामुळे त्या महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता . त्या महिलांनाही एकूण ३ महिन्यांचे ४५०० रुपये देण्यात येतील असं आदिती तटकरे यांनी सांगितले तिसऱ्या हप्यात एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख ही ३१ ऑगस्टपर्यंत होती. मात्र नंतर राज्य सरकारने याच्या नोंदणीची तारीख पुढे वाढवत ती ३० सप्टेंबरपर्यंत केली आहे. आत्तापर्यंत करोडो महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये जमा झाले आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणसाठी लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून राबवण्यात येत आहे, या योजनेमुळे राज्यभरातील महिलावर्गात मोठ्या आनंदाचे वातावरण आहे.
हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेनंतर वृद्धांना सरकार देत आहे 3 हजार रुपये खात्यात इथे करा आजच अर्ज