शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत करा लवकर हे काम खात्यात होणार 50 हजार रुपये जमा

नमस्कार मित्रांनो पिकांचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. यासाठी कृषी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात विविध प्रयोग करून पीक उत्पादकता वाढविणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे बक्षीस मिळणार आहे.राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत खरीप हंगामाच्या सुरुवातीला प्रोत्साहन देण्यात यावे. यासाठी अन्नधान्य, कडधान्ये व पडीत पिकांसाठी आंतरराज्य पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

इथे क्लिक करून बघा पात्र शेतकरी

 

राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या शेतकऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळणार असून, या स्पर्धेसाठी शेतकरी 31 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. ही स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेत सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकरी सहभागी होऊ शकतात. मूग आणि उडीद पिकांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येतील.

 

हे सुध्दा बघा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा झाला वाटप, इथे बघा यादी जाहीर

Leave a Comment