नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत.
सरकारने लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांत 3000 रुपयांचा बोनस जारी केला आहे. तसंच, काही निवडक महिलांना व तरुणींना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे.
5500 रुपयांचा होणार लाभइकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी सणाच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेंतर्गंत सर्व लाभार्थ्यांना 3000 रुपयांचा बोनस जारी करण्यात येणार आहे. या बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त अतिरिक्त असणार आहे. या व्यतिरिक्त 2500 रुपयांना अतिरिक्त रक्कमदेखील खात्यात जमा होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात 5500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे.दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलानांच मिळणार आहे.