महिलांच्या खात्यात होणार 1500 रुपये जमा उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्याची प्रक्रिया

अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल.

पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.

ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.

वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.

अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.

या तारखेपासून अर्ज करता येईल?

1 जुलै 2024 अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होईल.

अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिवस 15 जुलै 2024 आहे.

तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024

तात्पुरत्या यादीवरील तक्रार/ हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 21 जुलै ते 30 जुलै आहे.

अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024 आहे.

लाभार्थ्यांचे बँकमध्ये E-KYC करणे 10 ऑगस्ट 2024

लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024

त्यानंतरच्या महिन्यांत देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत