नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये आणि राज्य सरकारने यावर्षीपासून सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून ६००० रुपये दिले जातात.
चौदाव्या हप्त्यापर्यंत राज्यातील 70 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज एका रोचक उत्तरादरम्यान सांगितले की, विविध मोहिमा राबवून गेल्या वर्षभरात या योजनेचे 20 लाख 50 हजार लाभार्थी वाढले आहेत.
हे सुद्धा वाचा हे कागदपत्रे असणार तरीही खात्यात येणार 1500 रुपये इथे करा अर्ज
पीएम किसान योजनेतील कागदपत्रे किंवा ई-केवायसी नसल्यामुळे राज्यातील 65,000 शेतकरी वंचित राहिल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह विविध सदस्यांनी चिंता व्यक्त केली. याकडे लक्ष वेधताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, 65 हजार शेतकऱ्यांचा संपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.