महिलांसाठी खुशखबर.! सरकार देत आहे महिलांना मोफत साडी इथे बघा पात्र महिला

नमस्कार मित्रांनो आचारसंहितेत शिथिलता दिल्यामुळे सरकारने साड्यांचे वाटप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना वर्षातून एकदा मोफत साड्या देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार मार्च महिन्यापासून रेशन दुकानांमधून या साड्यांचे वाटप सुरू करण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या.

 

हे सुद्धा वाचा सरकार देत आहे शेतकऱ्यांना मोफत बियाणे इथे बघा पात्र शेतकरी

 

या दिवसापासून देशात आचारसंहिता लागू झाली होती. यामुळे साड्यांचे वितरण बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यात सुमारे ६६ हजार अंत्योदय कार्डधारक आहेत. ६० टक्के लाभार्थ्यांना साड्यांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांनाही साड्यांचे वाटप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. POS मशीनवर नोंदणी केलेल्या उर्वरित लाभार्थ्यांनाच साड्या मिळतील. 16 मार्चपासून साडी वाटप बंद करण्यात आले होते.लोकसभा निवडणुकीनंतर साड्यांचे वाटप केले जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना साड्यांचे वाटप थांबले होते. आता उर्वरित लाभार्थ्यांना साड्या वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. रेशन दुकान मालकाच्या POS मशीनवर नोंदणी केल्यानंतर लाभार्थ्यांपर्यंत साड्या पोहोचतील. आचारसंहितेमुळे साडी वाटप बंद करण्यात आले होते. निवडणूक संपताच रेशन दुकान मालकांना साड्यांचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या कुटुंबांना साड्या मिळाल्या नाहीत अशा लाभार्थी. अशा लाभार्थींनी रेशन दुकानात जाऊन साड्या गोळा कराव्यात, असे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी सांगितले.

Leave a Comment