राज्य सरकारचा मोठा निर्णय.! या सर्व नागरिकांच्या खात्यात होणार निराधार योजनेचे पैसे जमा येथे बघा यादीत आपले नाव

नमस्कार मित्रांनो शासनाकडून लाभार्थ्यांच्या थेट बँकेतील खात्यात, पेन्शन योजनेचा लाभ देण्यात येणार असून वेळेत व डायरेक्ट पैसे बँक ट्रान्‍स्‍फर होणार आहे. त्यामुळे पैसे बँकेत खात्यावर आले का हे पाहण्यासाठी होणारे हेलपाटे बंद होणार आहेत. या प्रणालीमध्ये ४४ हजार लाभार्थ्यांची खाती अपडेट केली आहेत. उर्वरित ऑनलाईन कामकाज १३ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हाधिकारी कार्यालय महसूल यंत्रणेने ठेवले आहे

 

हे सुध्दा वाचा या महिलांच्या सुध्दा खात्यात होणार1500 रुपये जमा

 

जिल्ह्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी अशा विविध पेन्शन योजना सुरू आहेत. यामध्ये जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेमध्ये ६७ हजार तर श्रावणबाळ योजनेमध्ये ७८ हजार लाभार्थी आहेत. यापूर्वी राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी यानंतर तहसीलदार यानंतर बँकेत अशा टप्प्यामध्ये पैसे दिले जात होते. यामुळे लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळत नव्हते आणि बँकेत लाभार्थी हेलपाटे मारत होते. यानंतर राज्यभरात डायरेक्ट बँक ट्रान्‍स्‍फर (डीबीटी) प्रणाली सुरू केली आहे. यामध्ये राज्य शासनाकडून थेट अनुदान लाभार्थ्याच्या बँक खात्यावर ट्रान्‍स्‍‍फर होणार आहे.

Leave a Comment