शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई झाली जमा येथे तपास यादीत आपले नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती, पावसाचा खंड यामुळे खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये पिकांचे नुकसान झाले.

या नुकसान भरपाईपोटी २ लाख ६० हजार ३७१ शेतकऱ्यांना ११७ कोटी ७ लाखांचा पीकविमा परतावा मंजूर झाला आहे

 

हे सुद्धा वाचा सरकार देणार आता शेतकऱ्यांना मोफत वीज हे असणार फक्त पात्र शेतकरी

 

या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर रक्कम वर्ग केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यातील बहुतांश शेती ओलीताखाली आली आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे पिकांचे नुकना झाले तर शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी यासाठी राज्य शासनाने एक रुपया भरून पीकविमा योजना सुरू केली आहे. या पंतप्रधान पीकविमा योजनेत खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये ३ लाख ७७ हजार ८४४ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

Leave a Comment