राज्य सरकारचा मोठा निर्णय.! या विद्यार्थ्यांच्या खात्यावर राज्य सरकार करणार महिन्याला 10 हजार रुपये जमा

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात बाहेर पडलेल्या तरूण-तरूणींना कामाचा अनुभव नसल्याने अपेक्षित नोकरी मिळत नाही. त्यातूनच बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या अनुभव काळात शासनाकडून दरमहा विद्यावेतन दिले जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

इथे क्लिक करून बघा अर्ज प्रकिया

 

किमान २० रोजगार देणाऱ्या उद्योगांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यातील १० लाख युवकांना या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण काळात विद्यावेतन दिले जाणार आहे. पण, एका महिन्यात तो दहा दिवस किंवा त्याहून अधिक दिवस गैरहजर राहिल्यास किंवा प्रशिक्षणार्थी पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास, त्यांना विद्यावेतन मिळणार नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग व ॲप्रेंटिस बंधनकारक असून त्या तरूणांनाही या योजनेतून विद्यावेतनाचा लाभ दिला जाणार आहे.

 

इथे क्लिक करून बघा अर्ज प्रकिया

Leave a Comment