दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! या दिवशी होणार खात्यावर अनुदानाची रक्कम जमा

नमस्कार मित्रांनो शेतीसोबतच दुधाचे उत्पन्नही राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतीसोबतच्या या संयुक्त उपक्रमामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळतो. त्यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, लवकरच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत. सरकारने दुधावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले असून शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्यातील शेवटच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती या पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी दुग्धविकास अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे.

 

हे सुद्धा वाचा : केंद्रीय राखीव पोलीस दलात या पदांसाठी निघाली मोठी भरती मिळणार 85 हजार रुपये पगार इथे बघा अर्ज प्रक्रिया

 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या अनुदानाच्या अटीही शिथिल करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत असल्याचे दुग्धमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. त्यामुळे दूध उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, दूध पावडरचे उत्पादन वाढवून निर्यातीला चालना देण्यासाठी प्रतिकिलो 30 रुपये अनुदान दिले जाणार आहे. चाऱ्याच्या किमती नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न सुरू असून राज्यात 70 लाख मेट्रिक टन चारा उत्पादित झाला आहे. यासंदर्भात पशुखाद्य उत्पादक कंपन्यांसोबत बैठका झाल्या आहेत.

Leave a Comment