आधार कार्ड अपलोड करतांना अनेकजण एकाच बाजूचा फोटो काढून अपलोड करण्याची शक्यता असते कारण आधारच्या दोन्ही बाजूचा फोटो एकदाच अपलोड होत नाही.
त्यामुळे केवळ पुढच्या बाजूचा फोटो कडून जर तुम्ही अपलोड केले तर अशावेळी तुमचा अर्ज रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोन्ही बाजूचे करा कागदपत्रे अपलोड
असे न करता आधार कार्डचा दोन्ही बाजूचे दोन फोटो काढून घ्या आणि हे दोन फोटो एकत्र जोडून एकदाच अपलोड करा.
मतदान कार्ड सुद्धा अशाच पद्धतीने अपलोड करा पुढचा फोटो आणि मागील बाजूचा फोटो एकत्र जोडून घ्या आणि अपलोड करा.
राशन कार्डचे सुद्धा पहिल्या पानाचा फोटो आणि मागील पानाचा फोटो असे दोन फोटो काढून घ्या एकत्र जोडा आणि दोन्हीचा एकच फोटो अपलोड करा.