नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री ‘लाडा भाऊ’ योजनेंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, पदविका विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये मानधन देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
‘लाडा भाऊ’ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच त्यांना स्वयंरोजगार मिळेल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल.
ती व्यक्ती मूळची महाराष्ट्र राज्यातील असावी
‘लाडा भाऊ’ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ‘लाडा भाऊ’ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असावे. तसेच, अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे