नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महागठबंधन सरकारने कामाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
सामाजिक न्याय विभागांतर्गत वसतिगृहे आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
वसतिगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध विभागांच्या वसतिगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात लक्षणीय वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सामाजिक न्याय, अपंग कल्याण, इतर मागासवर्गीय कल्याण, आदिवासी विकास, महिला आणि बाल विकास या विभागांतर्गत चालणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांना दरडोई देखभाल अनुदान दिले जाते. आता ते प्रति विद्यार्थी 1500 रुपयांवरून 2200 रुपये प्रति महिना करण्यात येणार आहे. एड्स आणि मतिमंद असलेल्या निवासी विद्यार्थ्यांना दिले जाणारे अनुदान 1650 रुपयांवरून 2450 रुपये करण्यात येणार आहे.
हे सुद्धा बघा : ऑगस्ट महिना सुरू होताच सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, इथे बघा आजच नवीन दर
त्यासाठी 346 कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या सर्व संस्थांमधून एकूण 4 लाख 94 हजार 707 विद्यार्थी असून सुमारे 5 हजार संस्था आहेत. वाढत्या महागाईमुळे हे अनुदानही वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती.