नमस्कार मित्रांनो आता केंद्र सरकारने सध्या सुरू असलेल्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (EMPS) चा कालावधी 2024 पर्यंत वाढवला आहे. देशभरात ग्रीन मोबिलिटी आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मिती परिसंस्थेला चालना देण्यासाठी सरकारने ही योजना आता दोन महिन्यांसाठी वाढवली आहे. वाहन उत्पादक आणि ग्राहक दोघेही ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या वर्षी EMPS योजनेचा FAME-II संपल्यानंतर ही योजना 1 एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्यात आली. तीन महिन्यांपासून ही योजना सुरू होती. ही योजना 31 जुलै रोजी संपणार होती. या योजनेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी 500 कोटी रुपयांचे बजेट मांडण्यात आले होते, मात्र आता या योजनेला दोन महिन्यांनी मुदतवाढ दिल्याने बजेट 769.65 कोटी रुपये झाले आहे.
हे सुद्धा वाचा शिंदे सरकार करणाऱ या विद्यार्थ्यांच्या खात्यावर पंचवीसशे रुपये जमा