शेतकऱ्यांच्या खात्यात दूध अनुदानाची रक्कम झाली जमा इथे बघा यादीत आपले नाव

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले होते. यामध्ये जिल्ह्यातील 1 लाख 8 हजार 223 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दूध अनुदानाचे 18 कोटी रुपये जमा झाले आहेत.

आतापर्यंत ७५ टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले असून, या अनुदानामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही फायदा व्हावा, यासाठी सरकारने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यात अडथळे येत होते.

हे सुद्धा बघा : ठाणे महानगरपालिकेत निघाली या पदांसाठी मोठी बंपर भरती येथे क्लिक करून बघा अर्ज प्रक्रिया

जिल्ह्यातील काही शेतकरी शेजारील जिल्ह्यातील दूध संघांना दूध पुरवठा करत आहेत. अशा शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांनाही अनुदानाचा लाभ दिला जात आहे. यासोबतच एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाने मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील 24 संकलन समित्यांच्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळाला आहे. यातील बहुतांश शेतकरी गोविंद दूध व दूध संस्थेचे आहेत. दुधाच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शिवाय दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी व चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. या काळात शेतकऱ्यांना अनुदान मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्हा दुग्धविकास अधिकारी प्रकाश आवटे व संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जेराव धुरगुडे, अतुल रासकर यांनी शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Comment