शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती.! हेक्टरी 5000 रुपये खात्यावर मिळवण्यासाठी करावे लागणार हे काम

नमस्कार मित्रांनो गतवर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून हेक्टरी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

मात्र, ही मदत देताना ई-पीक पाही ॲपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार असून, या शेतकऱ्यांचे बँक खातेही आधारशी लिंक करून ही मदत लवकरच दिली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

हे सुद्धा बघा : रक्षाबंधनाला शेतकऱ्यांना मिळणार दुहेरी आनंद, 2000 ऐवजी खात्यात 5000 रुपये मिळणार आहेत.

अशा शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती. यानुसार दोन हेक्टरसाठी किमान एक हजार रुपये आणि मर्यादित कमाल दहा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे.

यासंदर्भात शासन आदेशही जारी करण्यात आला आहे. ही मदत देण्यासाठी राज्य सरकारला एकूण 4 हजार 194 कोटी 68 लाख रुपयांची गरज लागणार आहे. यापैकी 1 हजार 548 कोटी 34 लाख रुपये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना, तर 2 हजार 646 कोटी 34 लाख रुपयांचे सोयाबीन शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाने जिल्हानिहाय व तालुकानिहाय यादी तयार केली आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-पीक तपासणी झाली आहे, अशा शेतकऱ्यांचाच त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील 53 लाख 82 हजार 824 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून, 29 लाख 89 हजार 912 कापूस उत्पादक शेतकरी या योजनेचा लाभ घेणार असल्याचे राज्याचे कृषी संचालक विनय आवटे यांनी सांगितले.

Leave a Comment