नमस्कार मित्रांनो देशभरात सध्या पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट देखील होत आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण पीक उद्धवस्त झालं आहे.
अशातच वीज कोसळून अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाऊस पडत असताना झाडाच्या खाली उभं राहून फोनवर बोलत असलेल्या एका युवकाच्या अंगावर वीज पडली. यामध्ये वीज पडल्यानं मोबाईलचा स्फोट झाला अन् तो क्षणात खाली कोसळला. पावसाची स्थिती निर्माण होत असताना आकाशात वीज चमकत असताना फोनवर बोलणं युवकाच्या जीवावर बेतलं आहे. काही क्षणातच होत्याचं नव्हतं झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
इथे क्लिक करून बघा विजेचा व्हिडिओ
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रिमझिम पाऊस पडत आहे आणि यावेळी एक तरुण झाडाच्या खाली बाईकवर बसून फोनवर बोलत आहे. अचानक जोरात आवाज येतो वीज कोसळते आणि हा तरुण क्षणात जमीनीवर कोसळतो. हा सर्व प्रकार अचानरपणे कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल एवढं नक्की. पावसाच्या काळात वीज चमकत असताना झाडांच्या आडोशाला थांबल्यानं अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्कता बाळगणं आवश्यक आहे.आपण मोबाईलवर बोलत असताना आपला मोबाईल हा मोबाईल टावर सोबत कनेक्ट असतो. आपण ज्यावेळेस मोबाईलवर बोलतो त्यावेळेस आपला आवाज हा ध्वनी लहरी च्या आधारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतो. या ध्वनी लहरी आकाशातून वाहत असतात. आणि ज्या वेळेस आपल्या मोबाईलचा डेटा हा ऑन असतो.त्यावेळेस आपला मोबाईल हा सतत मोबाईल टावर आणि इंटरनेट सोबत कनेक्ट असतो. आणि ज्या वेळेस विजा चमकतात किंवा पडतात त्यावेळेस विजा या त्या लहरींचा आधार घेऊन आपल्यापर्यंत पोहोचू शकतात.