शेतकऱ्यांच्या खात्यात होत आहेत नुकसान भरपाईची रक्कम जमा इथे तपासा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो चालू वर्षीत फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांमध्ये नैसर्गिक संकट ओढवून झालेल्या पीक नुकसानीपोटी शासनस्तरावरून अमरावती विभागातील २ लाख १३ हजार २६२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ‘डीबीटी’द्वारे भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

यासंदर्भात २ ऑगस्ट रोजी पारित झालेल्या शासन निर्णयात नमूद आहे की, जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये अवेळी झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले.फेब्रुवारी महिन्यात अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात ९ हजार ६४४, अकोला ११ हजार ८०७, यवतमाळ ११ हजार २४३, बुलढाणा ५७ हजार २४० आणि वाशिम जिल्ह्यातील ८ हजार २४१ शेतकरी यामुळे बाधित झाले. भरपाईपोटी १४१ कोटी १२ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले.

तसेच मार्च ते एप्रिल या महिन्यांमध्ये देखील विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये १ लाख १५ हजार ४७ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, त्यांच्यासाठी २४१ कोटींची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

५ ऑगस्टपासून प्रत्यक्षात हा निधी ‘डीबीटी’द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती.! हेक्टरी 5000 रुपये खात्यावर मिळवण्यासाठी करावे लागणार हे काम

Leave a Comment