महिलांसाठी मोठी खुशखबर.! लाडकी बहीण योजनेत झाली मुदतवाढ या तारखेपर्यंत करता येणार आता अर्ज

या बैठकीनंतर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही माहिती देत असताना यावेळी महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते.