सरकारचा मोठा निर्णय.! या शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार करणार नाही 50 हजार रुपये जमा

नमस्कार मित्रांनोआधार कार्ड प्रमाणीकरण न झाल्याने राज्यभरातील ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी मिळालेला नाही. २०१९ पासून शेतकऱ्यांना निधी मिळालेला नाही. शासनाने या खात्याचे आधार प्रमाणीकरणाच्या सूचना दिल्या असून सात सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मध्ये सुरू झाली. या योजनेतंर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधीची घोषणा तत्कालीन सरकारने केली होती. योजनेत पात्र ठरलेल्या १४ लाख ४० हजार कर्जखात्यासाठी ५ हजार २२२ कोटी रुपयांचा लाभ मंजूर करण्यात आला होता.

यातील १४ लाख ३८ हजार खातेदारांना ५ हजार २१६.७५ कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे.

हे सुद्धा बघा : रेशन धारकांसाठी मोठी माहिती.! आता या लोकांना मिळणार नाही मोफत रेशनचा लाभ

इतर पात्र शेतकऱ्यांना मदतीची प्रक्रिया सुरू आहे. योजनेत पात्र ठरलेल्या ३३ हजार ३५३ खातेधारकांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांचा लाभ अडकलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. अजूनही आधार प्रमाणीकरण झालेले नाही. प्रमाणिकरण न होण्याच्या अनेक अडचणी आहेत. यात मयत सभासद, नावात बदल, संयुक्त सातबारा आदीचा समावेश आहे. शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. आधार प्रमाणीकरण सुरू केले आहे.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या खातेधारकांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. आधार प्रमाणीकरण न झालेल्या ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांना १२ ऑगस्ट ते सात सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण गरजेचे आहे

Leave a Comment