कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.! सरकार करणार कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना जाहीर

नमस्कार मित्रांनो केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्‍हणाले की, आज केंद्रीय मंत्रिमंडळाने खात्रीशीर निवृत्ती वेतन देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) मंजूर केली आहे.

५० टक्‍के खात्रीशीर पेन्शन हा योजनेचा पहिला टप्‍पा आहे. तर दुसरा टप्‍पा आश्वस्त कुटुंब असेल. पेन्शन. केंद्र सरकारच्या सुमारे 23 लाख कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) चा फायदा होईल. कर्मचाऱ्यांना NPS आणि UPS मध्ये निवड करण्याचा पर्याय असेल, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

हे सुद्धा बघा : महिलांसाठी मोठी खुशखबर.! लाडकी बहीण योजनेत झाली मुदतवाढ या तारखेपर्यंत करता येणार आता अर्ज

मंत्रिमंडळाच्या निर्णयाची घोषणा करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, NPS योजनेत सुधारणा व्हावी, अशी देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांची नेहमीच मागणी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2023 मध्ये या सुधारणांसाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्ष डॉ.सोमनाथन होते. या समितीने 100 हून अधिक सरकारी कर्मचारी संघटनांशी चर्चा केली. या समितीने जवळपास सर्वच राज्यांशी चर्चा केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनाही प्राधान्य देण्यात आले. पंतप्रधानांनी ही बाब गांभीर्याने घेतली होती. समितीच्या शिफारशीच्या आधारे सरकारने एकात्मिक पेन्शन योजनेला मान्यता दिली आहे.

Leave a Comment