नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या नागरिकांच्या आधार कार्ड 10 वर्षापेक्षा जास्त जुने झालेले आहे.
त्यांनी ती माहिती अपडेट करणे खूप गरजेचे आहे. आधार कार्ड असेल तर त्यातील बऱ्याच गोष्टी बदलतात. आधार कार्ड अपडेटबाबत मुदत देखील दिली होती. आता ती मुदत वाढवण्यात आलेली आहे. हे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी देखील द्यावी लागणार नाही.
UIDAI यांनी आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी मुदतवाढ केलेली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. 14 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्हाला मोफत हे आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी माय आधार पोर्टलवर जावे लागेल. आणि तिथे जाऊन माहिती अपडेट करावी लागेल. यात तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड द्यावे लागते. आणि पत्त्याचा पुरावा म्हणून मतदान कार्ड द्यावे लागते. आधार अपडेट करण्याची मुदत ही तिसऱ्यांदा वाढवलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या आधार कार्ड अपडेट करून घ्या.
सगळ्यात आधी तुम्हाला UIDAI यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
ते पेज ओपन झाल्यावर तुम्हाला अपडेट आधार या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तिथे तुमचा आधार नंबर एंटर करा आणि त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी नंबर तेथे एंटर करा.
त्यानंतर तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी करून अपडेट करावा लागेल.
तुमचं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा असलेली कागदपत्र स्कॅन करावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटणावर क्लिक करावे लागेल.