शिंदे सरकारने महिलांना दिली खुशखबर.! शिंदे सरकार करणार या महिलांना 10 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास 5 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

सरकारने या निर्णयासाठी प्रति वर्ष अंदाजित 1.05 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. तसेच हा निर्णय 01 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येणार असल्याची देखील माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. राज्य सरकारने यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास देखील मान्यता दिली आहे.

हे सुद्धा बघा : जिओ धारकांसाठी खुशखबर.! जिओ देणार आता तुम्हाला तीन महिने मोफत फ्री कॉलिंग आणि इंटरनेट

राज्यात दररोज आशा स्वयंसेविकांना माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात.

तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने आशासेविकांसाठी मोठा निर्णय घेत आशासेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ केली होती

Leave a Comment