महिलांसाठी आनंदाची बातमी.! लाडकी बहीण योजनेची दुसऱ्या हप्त्याची तारीख झाली जाहीर इथे लगेच यादीत नाव बघा

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातील लाखो महिलांनी या योजनेसाठी आपला अर्ज दाखल केला आहे

यातील काही महिलांना या योजनेचे पहिले 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये मिळाले आहेत. मात्र, अद्यापही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.या महिलांना आगामी काळात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी 3 महिन्यांचे 4500 रुपये जमा होणार आहेत. परंतु यासाठी कोण पात्र ठरणार आहे आणि हे 4500 रुपये खात्यात जमा करण्यासाठी महिलांना काय प्रोसेस करावी लागणार आहे, हे जाणून घेऊयात.

हे सुद्धा बघा : आधार धारकांसाठी खुशखबर.! आता या तारखेपर्यंत करता येणार तुम्हाला मोफत आधार अपडेट

यामध्ये सर्वप्रथम म्हणजे आपल्या महिलांनी 31 जुलैनंतर आणि 31 ऑगस्टपूर्वी योजनेचा अर्ज केला आहे त्यांच्याच खात्यात सप्टेंबर महिन्यामध्ये 4500 रुपये जमा होणार आहेत. काही महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे. मात्र, काही अर्जदारांची कागदपत्रे नीट अपलोड केलेली नाहीत.ही कागदपत्रे धूसर असल्याने स्पष्ट दिसत नाहीत. तसेच काहींनी स्वतःचा आधार नंबर आणि बँक खाते क्रमांक चुकीचा टाकला आहे. त्यामुळे त्यांचे पैसे मिळालेले नाही. अशा महिलांना सरकारने पुन्हा री सबमिटचा पर्याय दिला आहे. त्यामुळे आता या महिलांनी पुन्हा फॉर्म भरून सबमिट करायचा आहे.

हा अर्ज मंजुर झाल्यानंतर तुम्हाला या योजेनेचे येत्या सप्टेंबर महिन्यात 4500 रूपये मिळू शकतात. त्यामुळे ज्या महिलांच्या अर्जात दुरुस्ती करायची आहे. त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अधिक माहितीसाठी महिला व बाल विकास मंत्रालयाने 181 हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. यावर तुम्ही संपर्क साधून तुम्ही योजनेची अधिक माहिती आणि प्रोसेस जाणून घेऊ शकता.

Leave a Comment