नमस्कार मित्रांनो महिन्याच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या दरात काहीशी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.
गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असताना, कालही सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली. त्यामुळे आता ग्राहकाला तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? 10 ग्रॅमची किंमत किती आहे? जाणून घेऊया आजच्या ताज्या किमती.
सराफा बाजारानुसार गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून आले. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव महिनाभरापूर्वीच्या तुलनेत कमी झाला. काल भावात थोडीशी घसरण झाल्याचे दिसून आले.
ग्राहकांना जरी आज दिलासा मिळणार असला तरी सोन्याच्या किंमतीत केवळ ९० रुपयांची घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याला आता ग्राहकांना 76,831 रुपये द्यावे लागतील. तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत सध्या 65,872 रुपये झाली आहे.
24 कॅरेट सोनं सध्या तोळ्यामागे 83,816 रुपये असून दहा ग्रॅमसाठी 71,860 रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.