वाहन चालकांसाठी खुशखबर.! आता भरावा लागणार नाही तुम्हाला इतक्या किलोमीटर पर्यंत टोल टॅक्स

नमस्कार मित्रांनो टॅक्सी क्रमांक असलेल्या वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध नसून, खासगी वाहने असलेल्यांनाच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

हे सुद्धा बघा : कांद्याच्या बाजारभावात झाली आज मोठ्या प्रमाणात वाढ इथे बघा आजचे ताजे दर

सरकारने म्हटले आहे की जर एखादे वाहन ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) ने सुसज्ज असेल आणि ते कार्यरत असेल, तर ते वाहन महामार्गावर किंवा एक्सप्रेसवेवर दररोज 20 किमी चालविण्यासाठी टोल टॅक्स द्यावा लागणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) नियम, 2008 मध्ये सुधारणा केली आहे. GNSS ही एक प्रकारची उपग्रह प्रणाली आहे जी वाहनाच्या स्थानाबद्दल माहिती देते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 मध्ये बदलांची अधिसूचना जारी केली आहे. वाहनाने दररोज 20 किमीपेक्षा जास्त अंतर कापले तर त्याच्याकडून टोल टॅक्स वसूल केला जाईल, असे या अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. हा कर प्रत्यक्षात वाहनाने कापलेल्या अंतरानुसार असेल. महामार्ग किंवा एक्स्प्रेस वेवर एखादी कार दररोज 20 किमी चालवल्यास त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही. मात्र वाहनाने 20 किमीपेक्षा जास्त प्रवास केल्यास टोल आकारला जाईल.

Leave a Comment