नमस्कार मित्रांनो महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या आणि आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील १६,२६७ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३२.४२ कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.
८०६ शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण न केल्याने त्यांना १८ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे.
२०१७-१८ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज ३० जून, २०१८ पर्यंत पूर्णतः परतफेड केलेली असेल, २०१८-१९ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज ३० जून, २०१९ पर्यंत पूर्णतः फेडलेले असेल, २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत पूर्णतः फेडलेले असल्यास प्रोत्साहनपर लाभ दिला जातो.
हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज झाले बंद आता या ठिकाणी करावा लागणार तुम्हाला अर्ज
अथवा या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जो नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची व्याजासह पूर्णतः परतफेड केलेली असेल, अशा शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ दिला जातो.
हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज झाले बंद आता या ठिकाणी करावा लागणार तुम्हाला अर्ज