नमस्कार मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर महाराष्ट्र शासनाकडून ५०,००० रुपये मिळतात.
केंद्र सरकारने २०१६ साली मुलींसाठी खास योजना राबवली आहे.या योजनेत मुलींच्या जन्मावेळी पालकांना ५०,००० रुपये दिले जातात. या योजनेत विमा संरक्षणही दिले जाते. मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी लाभ घेण्यासाठी अर्जदार हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेत आई आणि मुलीच्या नावाने संयुक्त खाते उघडले जाते. त्यांना १ लाख रुपयांना अपघात विमा आणि ५० हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो. याशिवाय मुलीच्या जन्मानंतर पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यानंतर त्यांना ५० हजार रुपये दिले जाणार आहे. दोन मुलींच्या जन्मानंतर जर शस्त्रक्रिया केली तर २५,०००-२५,००० रुपये दिले जाणार आहे.
हे सुद्धा बघा : या तारखेपर्यंत करा आधार कार्ड मोफत अपडेट नंतर बसणार तुम्हाला इतके रुपयांचा दंड
माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर फॉर्म डाउनलोड करुन तो भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर तो तुम्हाला महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावा लागेल.
हे सुद्धा बघा : या तारखेपर्यंत करा आधार कार्ड मोफत अपडेट नंतर बसणार तुम्हाला इतके रुपयांचा दंड