नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात 540 पदं भरली जाणार आहेत.
इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदभरती प्रक्रियेसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत.
या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. फॉर्म भरण्यासाठी तसंच अर्ज शुल्क भरण्याची शेवटची मुदत 6 नोव्हेंबर 2024 आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.
हे सुद्धा बघा : तुमचे एका पेक्षा जास्त बँक खाते असल्यास तुमचा सिव्हिल स्कोर होणार खराब इथे तपासा
या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दल अर्थात आयटीबीपीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. आयटीबीपीने नुकतंच कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या 540हून अधिक जास्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. या पदासाठी योग्य आणि इच्छुक उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटवर 8 ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या या भरती प्रक्रियेतून कॉन्स्टेबल ड्रायव्हर नियुक्त केले जाणार आहेत. यात एकूण पदसंख्या 545 आहे. श्रेणीनुसार पदांचा तपशील पाहता यात अनारक्षित 209, ओबीसी 164, ईडब्ल्यूएस 55, एससी 77, एसटी 40 अशी एकूण 545 पदं आहेत. पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावं.इच्छुक उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेला असावा. तसंच उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे.
हे सुद्धा बघा : तुमचे एका पेक्षा जास्त बँक खाते असल्यास तुमचा सिव्हिल स्कोर होणार खराब इथे तपासा