नमस्कार मित्रांनो सूक्ष्म सिंचन योजनेतून कृषी विभागाकडून बसवलेले ठिबक संचचे अनुदान मंजूर झाल्याने जिल्ह्यातील साडेआठ हजार शेतकऱ्यांना २५ कोटी रुपये लवकरच मिळणार आहेत.
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत तुषार व ठिबक सिंचन योजनेतील साडेआठ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.२०२३-२४ मधील ठिबक सिंचनचे २५ कोटींचे अनुदान रखडले आहे. या संदर्भात जय किसान फार्मर्स फोरमने जिल्हा कृषी अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.ऑगस्टपर्यंत अनुदान न मिळाल्यास कृषी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. ७ सप्टेंबर २०२४ रोजी अनुदान वर्ग होणार असल्याची माहिती कृषी संचालक डॉ. कैलास मोते यांनी दिली. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.