नमस्कार मित्रांनो सरकारी तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 17 सप्टेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.
देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केले जातातत्यानुसार आज यूपी, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. त्याचबरोबर बिहारसह अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. अशा स्थितीत पेट्रोल पंपावर जाऊन गाडीची टाकी भरण्याआधी तुमच्या शहरात आज पेट्रोल आणि डिझेल किती दरात उपलब्ध आहे हे जाणून घ्या.
हे सुद्धा बघा : सरकारचा मोठा निर्णय.! आता या नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलेंडर
गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारकडून पेट्रोल डिझेल दरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने इंधनदरात २ रुपयांची कपात केली होती. महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात 40 पैशांनी वाढ होऊन 104.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 39 पैशांनी वाढून 91.24 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर शेजारील राज्य यूपीमध्ये पेट्रोल 42 पैशांनी वाढून 94.81 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 48 पैशांनी वाढून 87.92 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.
हे सुद्धा बघा : सरकारचा मोठा निर्णय.! आता या नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलेंडर