नमस्कार मित्रांनो जमीनधारकांना मोजणीसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करणे आणि शुल्क भरणे यासह दाखल अर्जाच्या प्रगतीबाबत एसएमएसद्वारे माहिती देणारी.
तसेच मोजणीच्या नकाशाची प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देणारी ‘इ मोजणी व्हर्जन २.०’ (E Mojani 2.0) ही अद्ययावत संगणकप्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांत जमिनीची मोजणी वेळेवर होत नसल्यामुळे अनेक जमिनी वादात अडकल्या असून, पडीक पडल्या आहेत. शेतीपेक्षा शेतकऱ्यांना भाऊबंदकीमध्ये बांध आणि दगडावर अधिक लक्ष असते. त्यामुळे अशी अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित पडलेली आहेत. अशी प्रकरणे तातडीने मोजणी झाली तर न्यायालयातील जमिनीबाबतची अनेक प्रकरणे कमी होण्यास मदत होणार आहे.
मोजणीचे असे असणार फायदे…जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार.मोजणी शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा.अर्जाची सद्यःस्थिती एसएमएसने समजणार.जमीन मोजणी प्रत ऑनलाइन मिळणार.मोजणीच्या नकाशावर अक्षांश, रेखांशाचीमाहितीअसणार.जमिनीचे लोकेशन कळणार.