नमस्कार मित्रांनो महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने गतवर्षी कच्च्या तेलावरील आयात शुल्क रद्द केले होते.
त्यामुळे गगनाला भिडणाऱ्या खाद्यतेलाच्या किमती हळूहळू खाली घसरल्याने गृहिणीसह हॉटेलचालकांना मोठा दिलासा मिळाला होता, जवळपास वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किमती स्थिर होत्या. मात्र, दरवर्षी सणासुदीत तेलाची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे तेल बाजारात तेजी येते.
सध्या दसरा-दिवाळी तोंडावर आली असताना केंद्राने कच्चे सूर्यफूल, कच्चे पाम तेल आणि कच्चे सोयाबीनवरील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढवले आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत.सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाच्या किमती लिटरमागे २१ रुपयांनी बाढल्या असून, करडी, शेंगदाणा, सरकी, सरसो भाव देखील १० ते १९ तेलाचे रुपयांनी वाढल्याचे तेल विक्रेत्यांनी सांगितले. दरवर्षी सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेल दरवाढीचा भडका उडतो, हे काही नवीन नाही. मात्र लिटरमागे तब्बल २० ते ३० रुपयांच्या दरवाढीने चटका बसला आहे. याचा महिन्याच्या बजेटवर परिणाम जाणवत आहे.