लाडकी बहीण योजनेनंतर वृद्धांना सरकार देत आहे 3 हजार रुपये खात्यात इथे करा आजच अर्ज

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या वयोश्री योजनेला गती मिळत आहे.

या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले होते.

हे सुद्धा बघा : एसटी बस प्रवाशांसाठी खुशखबर.! आता या नागरिकांना सुद्धा मिळणार मोफत प्रवास

या योजनेला ज्येष्ठ नागरिकांनीही चांगला प्रतिसाद देत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून 20 हजार अर्ज दाखल केले आहेत.राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनमान सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहायक साधने, उपरकरणे खरेदीकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्याचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी रुपये 3 हजार इतकी रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधारसंलग्न खात्यात लाभ प्रदान करण्यात येतो.

31 डिसेंबर, 2023 अखेर वयाची 65 वर्ष पूर्ण केलली असावीत. आधारकार्ड असणे आवश्यक आहे अथवा आधारकार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक राहील. आधारकार्ड नसल्यास स्वतंत्र ओळख दस्ताऐवज असतील ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असावे. जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशनकार्ड किंवा राष्ट्रीय, सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजनेतंर्गत किंवा राज्य, केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेतंर्गत वृद्धपकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा आवश्यक राहील. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिंक उत्पन्न रुपये 2 लाखाच्या आत असावे. लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असतील.

हे सुद्धा बघा : एसटी बस प्रवाशांसाठी खुशखबर.! आता या नागरिकांना सुद्धा मिळणार मोफत प्रवास

Leave a Comment