जमीन खरेदी विक्रीच्या नियमात झाला आता मोठा बदल हा नवीन नियम झाला लागू

नमस्कार मित्रांनो मुद्रांक शुल्क कार्यालयात जागेची किंवा जमिनीच्या खरेदीवेळी आता खरेदी घेणारा व खरेदी देणाऱ्याचा आधारलिंक अंगठ्याचे ठसे जुळणे बंधनकारक आहे.

याशिवाय त्या मालमत्तेसंबंधीची सर्व कागदपत्रे असायलाच हवीत, असा नियम आहे.१०० ते ५०० रुपयांचा बॉण्ड अथवा तीन-सहा महिन्याच्या मुदतीची नोटरी करून ती जागा घेतली आहे. लाखो रुपये देऊनही त्यांना त्या जागेचा कायदेशीर मालकी हक्क मिळालेला नाही. एकच जागा मूळ मालकाने एकापेक्षा अधिक व्यक्तींना विकल्याचीही उदाहरणे आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी-विक्रीवरील निर्बंध हे आहे.

हे सुद्धा बघा : आता फक्त अर्ध्या तासात होणार तुमच्या शेत- जमिनीची मोजणी सरकारने सुरू केली खास सुविधा

दुसरीकडे जागांच्या किंमती वाढल्याने बनावट कागदपत्रे तयार करून, बनावट व्यक्ती उभी करून जागा बळकावण्याचेही प्रकार होत आहेत. एकाच सातबारावर एकापेक्षा अधिक जणांचा हिस्सा व नावे असतानाही त्यातील एकजण परस्पर स्वत:चा हिस्सा विकून उर्वरित जागेवर पुन्हा नावे नोंद करत असल्याचीही उदाहरणे आहेत. दरम्यान, सुखी संसारात रमलेल्या सामान्य व्यक्तींची फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा, कोणीही मालमत्तेची बनावट खरेदी-विक्री करू नये, म्हणून ठोस उपाय जरूरी असल्याची मागणी अनेकांची आहे.खुल्या जागेची खरेदी-विक्री करण्यासाठी त्या मालमत्तेचा सातबारा किंवा प्रापर्टी कार्ड, मोजणी नकाशा किंवा ले-आऊट, एनएन (अकृषिक) आदेश, गुंठेवारीचा झोन नकाशा जरूरी आहे. याशिवाय खरेदी देणारा व खरेदी घेणाऱ्या व्यक्तीचा ऑनलाइन आधारलिंक अंगठा देखील घेतला जातो. कोणाचीही फसवणूक होवू नये, म्हणून आता सर्व्हरला अडथळा असल्यास दस्त न करण्याच्या सूचनाही सर्वांना दिल्या आहेत.

हे सुद्धा बघा : आता फक्त अर्ध्या तासात होणार तुमच्या शेत- जमिनीची मोजणी सरकारने सुरू केली खास सुविधा

Leave a Comment