नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये (एमआयएस), तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळतं. भारत सरकारची ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जात आहे.
मासिक उत्पन्न योजना योजनेअंतर्गत, तुम्ही एकदा पैसे जमा करता आणि तुम्हाला त्यानंतर ५ वर्षांसाठी दर महिन्याला पैसे मिळतील.पोस्टाच्या योजना या जोखिममुक्त असतात. यामध्ये तुम्हाला परताव्याची हमीही मिळते. जर तुम्हाला घरी बसून नियमित उत्पन्न हवं असेल तर तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करू शकता.
यामध्ये गुंतवलेले पैसे तुम्हाला ५ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर मिळतील.जर तुम्हाला एमआयएस स्कीमद्वारे दरमहा ९२५० रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला संयुक्त खात्याद्वारे १५ लाख रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही या योजनेत १५ लाख रुपये गुंतवले तर ७.४ टक्के व्याजदराने तुम्हाला पाच वर्षांसाठी ०२५० रुपये मासिक उत्पन्न मिळेल. जर तुमचं एक खातं असेल आणि एकट्या व्यक्तीनं गुंतवणूक केली असेल तर तुम्ही ९ लाख रुपये गुंतवू शकाल. यातून तुम्हाला ५५५० रुपये मासिक उत्पन्न मिळेल. ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट परत मिळेल.