नमस्कार मित्रांनो कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण केलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.
एकूण रक्कम ४६ कोटी ७० लाख रुपये असून, सर्वाधिक ८२९ शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. राज्य सरकारने २०१९ मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली.अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले.
हे सुद्धा बघा : महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल झाले स्वस्त इथे जाणून घ्या जिल्ह्यानुसार नवीन दर
यासाठी आधार संलग्न बैंक खाते बंधनकारक करण्यात आले होते.मात्र, ऑगस्ट अखेर ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नसल्याचे आढळल्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर लाभ देता येत नव्हता. त्यासाठी राज्य सरकारने १२ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर अशी मुदत दिली होती.
हे सुद्धा बघा : महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल झाले स्वस्त इथे जाणून घ्या जिल्ह्यानुसार नवीन दर