नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे.
तर उर्वरीत महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे.काही महिलाच्या खात्यात 4500 तर काहींच्या खात्यात 1500 जमा झाले आहे. पण तुमच्या खात्यात यापैकी एकही रक्कम आली नाही आहे. जर तुमच्या बाबतीत ही घटना घडली असेल तर आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत. या पर्यायाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं नाव यादीत तपासता येणार आहे.
ही यादीत डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला यादीत तुमच्या अॅप्लिकेशन नंबर, नाव, मोबाईल नंबर आणि अॅर्जाची स्थिती सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या नाव किंवा अॅप्लिकेशन नंबरच्या आधारे तुमचं नाव तपासता येणार आहे. जर या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. एकतर ही यादी तुमच्या जिल्ह्याच्या महानगर पालिकेच्या वेबसाईटवर मिळेल किंवा ही यादी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेत लाभार्थी असलेल्या महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे. गुगलवर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर धुळे कॉर्पोरेशन टाकायचं आहे. धुळे कॉर्पोरेशन टाकल्यावर नवीन पेज उघडणार आहे. यामध्ये पहिलाच पर्याय माझी लाडकी बहीण-लाभार्थी यादी धुळे म्युनसिपल कॉर्पोरेशन असा येईल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन पेजवर यादी डाऊनलोड करण्याचा पर्याय येणार आहे. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला यादी डाऊनलोड करता येणार आहे.