नमस्कार मित्रांनो आईवडिलांना मुलींच्या लग्नाची काळजी असते. मुलींच्या लग्नासाठी खूप खर्च येतो. त्यामुळेच आईवडिलांना खूप काळजी असते. मुलीच्या लग्नासाठी खूप आधीपासूनच पैसे साठवतात. मुलींच्या लग्नासाठी येणारा खर्च लक्षात घेऊन राज्य सरकारने योजना सुरु केली आहे.
राज्य सरकारने मुलींच्या लग्नासाठी कन्यादान योजना राबवली आहे. कन्यादान योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या पालकांना मुलींच्या लग्नासाठी मदत केली जाते. गरीब कुटुंबातील लोकांना मुलींच्या लग्नासाठी जास्त खर्च होऊ नये. या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच लग्नासाठीचा खर्च कमी व्हावा यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना प्रोत्साहन दिले जाते. यासाठी महाराष्ट्र सरकारने योजना राबवली आहे.
हे सुद्धा बघा : दिवाळी अगोदर मोदी सरकारने दिली मोठी खुशखबर खाद्यतेल केले इतक्या रुपयांनी स्वस्त
कन्यादान योजनेअंतर्गत नव विवाहित दाम्प्त्याला २०,००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. वधूच्या आईवडिलांच्या नावाने ही मदत मंजूर केली जाते. मुलीचे आईवडिल हे पैसे लग्नासाठी वापरु शकतात. या योजनेअंतर्गत नवरा-नवरीला सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन लग्न करावे लागते. या योजनेत विवाहसोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेला ४००० रुपये दिले जातात.
हे सुद्धा बघा : दिवाळी अगोदर मोदी सरकारने दिली मोठी खुशखबर खाद्यतेल केले इतक्या रुपयांनी स्वस्त
योजनेत अर्ज करणारे वधू-वर महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.नवरा-नवरीपैकी एक जण अनुसूचित जाती जमातीचा असावा.वराचे वय २१ वर्ष आणि वधूचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.वधू-वरांच्या प्रथम विवाहासाठी हे अवुदान दिले जाणार आहे.या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्याचा भंग केलेला नसावा. याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.या नोकरीसाठी जातीचे प्रमाणपत्र हे अधिकाऱ्यांनी दिलेले असावे.