नमस्कार मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. महिलांची चिंता करू नये. दिवाळीआधी भाऊबीज म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देणार आहोत,
असे अजित पवार सभेत म्हणाले होते. त्यानुसार आता महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज काही महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहेत.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती.
त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते.