लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी.! लाडकी बहीण योजनेत झाली मुदतवाढ या तारखेपर्यंत करता येणार आता अर्ज

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेला 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी ही मुदत सप्टेंबर 2024 पर्यंत होती. आतापर्यंत ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला नाही, त्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

15 ऑक्टोबर 2024 ला रात्री 12 वाजेपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येतील, पण हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरता येणार आहेत.लाडकी बहीण योजनेला सरकारने दिलेली ही तिसरी मुदतवाढ आहे. याआधी 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती, पण या योजनेसाठी महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्यामुळे ही मुदत नंतर 31 ऑगस्टपर्यंत, त्यानंतर 30 सप्टेंबर आणि आता 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने केले दहा हजार रुपये जमा

लाडकी बहीण योजनेचा अर्ज देताना महिलांना आधार कार्ड, अधिवात/जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराचं हमीपत्र, बँक पासबूक आणि अर्जदाराचा फोटो द्यावे लागणार आहेत.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने केले दहा हजार रुपये जमा

Leave a Comment