घरावर सोलर पॅनल बसवा व मिळवा 78 हजार रुपये असा करा घरबसल्या अर्ज

नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल 6 हजार 341 घरगुती ग्राहकांनी अर्जाला मंजुरी मिळाली असून, 1 हजार 601 सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने त्यांचे वीजबिल देखील शून्यवत होणार आहे.

घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे 120 ते 360 युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे.

हे सुद्धा बघा : आता कर्ज घेण्यासाठी हा CIBIL स्कोर आवश्यक आहे, अन्यथा कोणतीही बँक पैसे देणार नाही.

सौर प्रकल्प उभारण्यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे.प्रधानमंत्री घरकुल योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात घेत आहे व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.घरावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीज ग्राहकांना 1 किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, 2 किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि 3 किलोवॉट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे.

हे सुद्धा बघा : आता कर्ज घेण्यासाठी हा CIBIL स्कोर आवश्यक आहे, अन्यथा कोणतीही बँक पैसे देणार नाही.

Leave a Comment