दिवाळीपूर्वी मोदी सरकारने दिले खुशखबर.! आता मिळणार वीस लाख रुपयापर्यंत कर्ज इथे बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो देशभरातील अनेक तरुणांना स्वतचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते. हीच बाब लक्षात घेऊन सरकारकडून प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना राबवली जाते.

या योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती साधता यावी, यासाठी केंद्रातील मोदी सरकारने दिवाळीच्या तोंडावर एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या तरुणांना आणि उद्योजकांना पूर्वीपेक्षा दुप्पट कर्ज मिळणार आहे.कर्ज मर्यादेत 20 लाख रुपयांपर्यंत वाढप्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत, मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै 2024 रोजी आर्थिक वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांची कर्ज मर्यादा वाढवून 20 लाख करण्यात येईल. आता या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.

हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेचे दिवाळी बोनस 5500 रुपये तुमच्या बँकेत जमा झाले का असे चेक करा स्टेटस

सध्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन श्रेणी आहेत. ज्या अंतर्गत कर्ज दिले जाते. आता तरुण प्लस नावाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. मुद्रा शिशु योजनेंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. किशोर योजनेअंतर्गत व्यवसाय करणाऱ्यांसाठी ५०,००० ते ५ लाख रुपयांपर्यंतचे मुद्रा कर्ज दिले जाते.

हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेचे दिवाळी बोनस 5500 रुपये तुमच्या बँकेत जमा झाले का असे चेक करा स्टेटस

तरुण योजनेंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा नियम आहे. तरुण योजनेंतर्गत घेतलेले कर्ज यशस्वीरीत्या परत केलेल्या व्यावसायिकांना आता त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी तरुण प्लस श्रेणी अंतर्गत 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे. त्यामुळे आता उद्योजकांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.

Leave a Comment